fbpx

स्मशानभूमीचे लोखंडी अँगल चोरी, 5 जणांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । स्मशानभूमी म्हणजे अशी जागा की जिथे माणसांना दिवसा जाण्यास भीती वाटते अशा स्मशानभूमीमध्ये चोरट्यांनी चक्क रात्रीच्या सुमारास जाऊन भिंतीवरील लोखंडी अँगल चोरून नेल्याची अफलातून घटना चाळीसगाव तालुक्यातील वाघडू येथे घडली आहे.

याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात साडेसतरा हजार रुपये किमतीचे लोखंडी अँगल चोरून नेल्याप्रकरणी भंगारविक्रेत्यासह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीने परिसरात खळबळ तर उडालीच मात्र आश्चर्य देखील व्यक्त होत आहे.

mi advt

या घटनेचे सविस्तर वृत्त असे की चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील ग्रामपंचायतीच्या निधीतून सन 2009 -10 मध्ये स्मशानभूमीच्या भिंतीला लोखंडी अँगल लावून तारेचे कुंपण करण्यात आले होते. रात्रीतून कुणीतरी हे लोखंडी अँगल चोरून नेल्याचे रविवारी 19 रोजी दुपारी उघडकीस आले. स्मशानभूमीत लोखंडी अँगल चोरून भंगार विक्री केल्याचे समोर येताच गावात एकच खळबळ उडाली. ग्रामसेवक सुनिल पवार व ग्रामपंचायत सदस्य राहुल पाटील यांना गावात भंगार विक्रेता शरीफ समशेर शेख रा.जामडी यांचेकडे हे चोरीचे लोखंडी अँगल दिसून आले.

याबाबत भंगार विक्रेत्याकडे विचारपूस केली असता विक्रेत्याने मी हे अँगल भिल्ल वस्तीतून संशयित छगन गायकवाड, सोमनाथ गायकवाड, अर्जुन गायकवाड, जगन गायकवाड यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. सुमारे 17 हजार 500 रुपयांचे 35 लोखंडी अँगल चोरून परस्पर विक्री केल्याप्रकरणी ग्रामसेवक सुनील जगन्नाथ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भंगार विक्रेत्यासह पाच जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज