चुंचाळेतील बेपत्ता भावंडांच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२१ । चुंचाळे ( ता. यावल ) येथील शिवारातून बुधवारी दुपारी रीतेश सावळे ( वय 5) हितेश सावळे ( वय 6 ) ही दोन्ही भावंडे बेपत्ता झाल्याप्रकरणी दाम्पत्यच्या फिर्यादीवरून  यावल पोलीसत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, चुंचाळे येथील गायरान परीसरातील रहिवासी रवींद्र सावळे आणि उज्ज्वला सावळे या दाम्पत्याची रीतेश सावळे (वय 5) हितेश सावळे (वय 6) ही मुले बुधवारी आपल्या आई-वडिलांसोबत शेतात गेली असताना बेपत्ता झाली. चुंचाळे शिवारासह नायगाव, सौखेडासीम आदींसह पंचक्रोशीत त्यांचा दुपारपासून शोध घेण्यात येत असला तरी ते मिळून न आल्याने सावळे दाम्पत्य धास्तावले आहे.

अपहरणाचा गुन्हा दाखल

बुधवारी रात्री पर्यंत चिमुकल्यांचा शोध न लागल्याने बालकांचे वडील रवींद्र मधुकर सावळे ( 35, रा.चुंचाळे, ता.यावल ) यांनी यावल पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार व सहा.पोलीस उपनिरीक्षक विजय पाचपोळे व सहकारी करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज