झाड तोडल्यावरून अमळनेरात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । अमळनेर शेतकी संघ जीन आवारातील वारुळाचे झाड ११ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आरीफखान युसुफखान पठाण याने तोडून, ट्रॅक्टरमध्ये लाकडे वाहून नेली. त्यामुळे पालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या फिर्यादीवरून १५ हजार रुपयांच्या झाडाची चोरी व झाड तोडल्याचा येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास हेडकॉन्स्टेबल बापू साळुंखे करत आहेत. पालिकेच्या मालकीच्या इमारतीतून झाडा तोडून, लाकूड लंपास केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -