रोहिणी खडसेंविरुद्ध गुन्हा दाखल करा : सावदा शहर शिवसेनेचे निवेदन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२१ । मुक्ताईनगर येथे शिवसेना व राष्ट्रवादी यांचे कार्यकर्त्यांमध्ये वाद होऊन परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले होते. याच बाबतीत जिल्हा बँक संचालिका रोहिणी खडसे खेवलकर यांनी आमदारास देखील वेळ पडल्यास चोप देऊ असे वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला. याचा निषेधार्थ सावदा शहर शिवसेनेतर्फे येथील पोलिसात निवेदन देत. सदर बाबतीत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी जळगाव लाईव्ह न्यूजवर माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांनी आमदारांना चोप देण्याची भाषा केल्याची वृत्त प्रसिद्ध झालेले आहे. त्यानुसार तमाम जनतेचे लोप्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तीच्या जीवितावर खडसे कुटुंबीय उठलेले दिसून येत असून, अतिशय वैफल्यग्रस्त झालेल्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्वयार चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, त्यानंतर होणाऱ्या परिणामास प्रशासन जवाबदार असेल असे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे व सदर व्यक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

या निवेदनावर शहराध्यक्ष सूरज परदेशी, भरत नेहेते, धनंजय चौधरी, विश्वनाथ माळी, सुनील चौधरी, शाहरुख तडवी, अशरफ तडवी, सुभाष सपकाळे, गणेश माळी, किरण गुरव यांचेसह अनेक शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -