जळगावात दोन गटात हाणामारी; परस्परविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२१ । शिवीगाळ केल्याच्या जाब विचारल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन तरूणावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार शनिवार दि.२७ रोजी जळगाव शहरातील वाल्मिक नगरातील कोळी पेठ भागात घडला. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवि कमलाकर बाविस्कर (वय-३४, रा. वाल्मिक नगर, कोळी पेठ, जळगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली असून या फिर्यादीत रवि बाविस्कर हा तरूण शनिवारी २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील वाल्मिक नगरातून जात असतांना सुरेश पुंडलिक ठाकरे याने त्याला थांबवून शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. या कारणावरून सुरेश ठाकरे, शंकर पुंडलिक ठाकरे, गणेश पुंडलिक ठाकरे (रा. वाल्मिक नगर) आणि हर्षल चंद्रकांत सोनवणे (रा. मेस्कोमाता नगर जळगाव) यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तर सुरेश ठाकरे आणि शंकर ठाकरे यांनीं तलवारने रवि बाविस्कर याच्या डोक्याला आणि हातावर वार करून जखमी केले, असे म्हटले आहे.

याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित सुरेश ठाकरे, शंकर ठाकरे, गणेश ठाकरे आणि हर्षल सोनवणे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -