जळगावात नगरसेवक-तरुणात हाणामारी, पोलीस ठाण्यात वाद

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट । शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या लाकूड पेठेत शनिवारी दुपारी १२ सुमारास नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांचा काही तरुणांसोबत वाद झाला वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने एका तरुणाचे डोके फुटले असून नगरसेवक नवनाथ दारकुंडे हे देखील जखमी झाले आहेत.

शहरातील शिवाजीनगर परिसरातील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांचा दुपारी १२ वाजेच्या सुमारास महेश सदाशिव पवार याच्यासह काही तरुणांसोबत वाद झाला. हाणामारीत महेश पवार याच्या डोक्याला दुखापत झाली असून तोंड फुटले आहे. नवनाथ दारकुंडे यांना देखील दुखापत झाली आहे.दरम्यान, शिवाजीनगरात असलेला जुना जकात नाका तोडण्यावरून हा वाद झाला असून त्याठिकाणी अवैध दारू विक्री होत होती असे समजते.

दरम्यान, दोन्ही गट तक्रार करण्यास शहर पोलिसात आले असता पोलिसांसमोरच पुन्हा हाणामारी झाली. तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.
व्हिडीओ :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar