fbpx

ओढरेच्या महिला सरपंच तीन अपत्यांमुळे ठरल्या अपात्र

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२१ । चाळीसगांव तालुक्यातील ओढरेच्या महिला सरपंच पुष्पा जगन पवार यांना तीन अपत्य असल्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14(ज 1) आणि कलाम 16 (2) नुसार त्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य राहण्यास अपात्र ठरल्या आहेत.

याबाबत निर्णय नुकताच पंचायत समिती गटविकास अधिकारी नंदकुमार बाळेकर यांनी दिला. तसे पत्र बुधवार 18 रोजी दिले. या निर्णयामुळे ओढरेसह चाळीसगांव तालुक्यात खळबळ उडाली आहे. पुष्पा पवार या आठ महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. मात्र त्यांचे पद कमी कालावधीचे ठरले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज