fbpx

रोहिणी येथे महिला सरपंचाला दारू पिऊन शिवीगाळ ; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२१ । दारू पिऊन महिला सरपंचाच्या घरासमोर मोठमोठ्याने आरडाओरडा करून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथील दोघांच्या विरोधात ॲट्रॉसिटी व अन्य कायद्यान्वये चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घटनेची माहिती अशी की दिनांक 11 रोजी सायंकाळी पीडित महिला सरपंच घरी असताना व तिचे पती मजुरी निमित्त बाहेर गेलेले असताना रोहिणी येथील बाळू नागरे व किरण नागरे हे दारूच्या नशेत अश्लील हावभाव करून मोठ्याने आरडाओरडा करत अपमान करण्याच्या उद्देशाने जातिवाचक व अश्लीलशब्दात शिवीगाळ केली.

mi advt

या प्रकरणी पीडित सरपंच महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात बाळू नागरे व किरण नागरे रा. रोहिणी यांच्या विरोधात भादंवि कलम 294, 504, 510, 34 सह अनुसूचित जाती जमाती कायदा कलम 3(1) आर एस डब्ल्यू (2)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे हे करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज