fbpx

पुरवठादाराच्या थकीत बिलामुळे ऑक्सिजन पुरवठा ठप्प होण्याची भीती

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२१ । भुसावळात ग्रामीण रुग्णालय व ट्राॅमा सेंटर सुरु झाले तेव्हापासून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराचे बिल प्रशासनाने थकवले आहे. आजवर तब्बल सव्वादोन लाख रुपयांचे बिल थकीत असल्याची माहिती समोर आली आहे. या थकीत बिलामुळे भुसावळ ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा थांबण्याची भीती आहे.

ग्रामीण रुग्णालय व ट्राॅमा सेंटरला रोज २२ ते २५ जंम्बो ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासते. शासनाकडून हे ऑक्सिजन सिलेंडर पुरवठादाराला आजवर मोबदला मिळालेला नाही. या पुरवठादाराचे एकूण २ लाख २४ हजार ४३२ रुपये शासनाकडे थकबाकी असल्याची माहित मिळाली आहे.

या पुरवठादाराने ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या डिलरचे बिल अदा न केल्याने त्यांच्याकडून येत्या काही दिवसात पुरवठा थांबण्याची शक्यता निर्माण झाली  आहे. यामुळे पर्यायाने ग्रामीण रुग्णालय व ट्राॅमा सेंटरलाही ऑक्सिजनचा पुरवठा थांबून ४५ ऑक्सिजन बेड बंद पडण्याचा धोका आहे.

दरम्यान, दोन दिवसात जिल्हा आरोग्य प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठादाराचे बिल अदा करावे. अन्यथा भुसावळ शहरात भिक मांगो आंदोलन करून पुरवठादाराचे बिल जमा करण्यात येईल, असा इशारा भाजपच्या वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तू. पाटील यांनी दिला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज