कबरस्थान सुशोभीकरणात कसूर; मुस्लिम युवकांची मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । जाफर मनियार । बोदवड शहरातील मुस्लिम कबरस्थानचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यात ठेकेदाराकडून कामात कसूर करून ओबडधोबड काम केले जात असल्याची तक्रार मुस्लिम युवकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, कब्रस्तान सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे परंतु, संबंधित ठेकेदार कामात कसूर करून ओबडधोबड काम करत आहे.
कब्रस्तान सुशोभीकरणाच्या निविदेमध्ये नवीन पाया रचना करून दोन्ही इमारती उभ्या कराव्या असे स्पष्ट उल्लेख असूनही संबंधित ठेकेदार एकाच इमारतीची नवीन पाया रचना करून इमारतीचे बांधकाम करत आहे. तर दुसरी इमारत ही जुना हाल असलेल्या जागेवर त्याच हॉलचे नूतनीकरण करून तेथेच या इमारतीचे बांधकाम करत आहे.
त्यामुळे हे काम नियमानुसार नसून बेकायदेशीर केले जात आहे व त्यातून संबंधित ठेकेदाराला पैसे वाचावे यासाठी असे बोगस काम केले जात असून, याकडे मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ लक्ष घालून कामाची पाहणी करावी व संबंधित ठेकेदाराला दुसऱ्या बिल्डिंगचे सुद्धा नवीन पाया रचना करून इमारत बांधकाम करण्याच्या सूचना द्या, अशी मागणी मुस्लिम युवकांनी केली असून, येत्या ३ दिवसात दाखल न घेतल्यास नगरपंचायत समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.

यावेळी कबरस्थान कमिटीचे अध्यक्ष हाजी युनूस बागवान, उपाध्यक्ष बिस्मिल्ला कुरेशी, सचिव सलामोद्दीन शेख, जावेद ठेकेदार, लतीफ शेख, जाफर शेख, नईम खान, हसन ठेकेदार, नदीम शेख व वसीम अक्रम आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -