फौजदाराला मारहाण : ८ जणांविरुद्ध गुन्हा, चौघांना अटक

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । भुसावळ शहरात रात्री गस्तीवर असताना बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने एका संशयिताला हटकावले होते. याचा राग आल्याने टोळक्याने पथकातील उपनिरीक्षकाला मारहाण केली.व गळा दाबून ठार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपनिरीक्षक महेश धायतड यांच्या फिर्यादीनुसार ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यातील चौघांना पोलिसांनी अटक केली.

गेल्या शनिवारी मध्यरात्री शहरातील श्रीराम नगराजवळील हनुमान मंदिराजवळ टोळक्याने फौजदारावर जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी उपनिरीक्षक महेश धायतड यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार तथा करणी सेनेचा खान्देश अध्यक्ष निखिल राजपूतसह अक्षय न्हावकर उर्फ थापा, गोलू कोल्हे, नकुल राजपूत, आकाश पाटील, अभिषेक शर्मा, नीलेश ठाकूर व अन्य एका अनोळखी अशा ८ जणांच्या टोळी विरोधात गुन्हा दाखल आहे. हे सर्व आरोपी पसार असल्याने पोलिस त्यांचा कसून शोध घेत होते.

त्यापैकी चेतन संतोष पाटील (वय २९), नीलेश चंद्रकांत ठाकूर (२१), ओमकार उर्फ गोलू विठ्ठल कोल्हे (२२) व आकाश गणेश पाटील (२३, सर्व रा.श्रीरामनगर, भुसावळ) या चौघांना वांजोळारोड परिसरातून अटक करण्यात आली. इतर चौघांचा शोध सुरू असल्याचे बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी सांगितले.

अटकेतील संशयितांची हाेणार ओळख परेड

अटकेतील संशयितांची ओळखपरेड हाेणार आहे. साेमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तेथे पाेलिसांनी पोलिस काेठडीचा हक्क राखून ठेवून चौघांच्या न्यायालयीन काेठडीची मागणी केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -