जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । भारती अॅक्सा लाईफ ईन्सुरन्स कंपनीच्या पॉलिसीवर सहा लाखांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली एका युवकाला एक लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फैजपू पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष युवराज तळेले (23, बामणोद ता. यावल ) हा युवक खाजगी नोकरी करतो. आशिषच्या मोबाईलवर मोबाईल क्रं 9911103905 व 9667852950 धारक यांनी फोन करून तुम्हाला भारती अॅक्सा लाईफ ईन्सुरन्स कंपनीच्या पॉलिसीवर सहा लाखांचे कर्ज मिळवून देतो, अशी थाप मारली. त्यासाठी तुम्हाला प्री पेमेंट चार्जेजसाठी 17 हजार 512 रुपये तसेच क्रेडीट चार्ज म्हणून 25 हजार 500 रुपये, फुल अॅण्ड फायनल सबमिशन पेमेंट म्हणून 30 हजार रुपये आणि लोण फायनल मंजूर करण्यासाठी तुम्हाला पुन्हा 28 हजार 400 रुपये भरावे लागतील व त्यावेळेस तुमचे लोण मंजुर होईल, असे सांगितले.
त्यामुळे आशिषने 10 ते 22 ऑगस्टच्या दरम्यान, 1 लाख 1 हजार 412 रुपये पाठविले परंतु कर्ज न मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आशिषने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख हे करीत आहेत.