fbpx

एमआयडीसी पोलिसांच्या सुप्रीम कंपनीबाबतच्या भुमिकेविरुद्ध उपोषण

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । येथील सुप्रीम कंपनी प्रशासनाने किमान वेतन, शासनाकडे जमा करावयाची प्रॉव्हिडंट फंडची रक्कम, ग्रॅज्युएटी, बोनस व निवृत्ती वेतन यात खोटे व बनावट कागदपत्रे बनवून ते खरे असल्याचे भासवून फसवणूक केली असल्याचा आरोप करीत प्रमोद मंत्री यांनी २७ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. 

दरम्यान, पोलिसांनी कंपनीच्या बाजूने खोटा अहवाल दिल्याने त्याचा कंपनी प्रशासन व संशयितांना फायदा झाला असून याबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप मंत्री यांनी केला आहे. तसेच कंपनीच्या कामगारांची दिशाभूल करीत कामगारांवर स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. याबाबत देखील एमआयडीसी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेविरुद्ध प्रमोद मंत्री, संदीप कदम यांनी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना निवेदन देत आज उपोषण पुकारले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज