जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन फायदेदायक योजना आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना तब्बल 3 लाख रुपयांचा फायदा होणार आहे. या योजनेबाबत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना माहिती पुरवली आहे. या माहितीमुळे शेतकऱ्यांना योजनेचा फायदा घेता येणार आहे.
पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजेच शेतकरी शेतीसोबतच मोठ्या प्रमाणावर पशुपालन करतील या उद्देशाने केंद्र सरकारने ही योजना समोर आणली आहे. या योजनेअंतर्गत गाय, म्हैस, बकरी, मच्छी पालन या व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून पशु किसान क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल तीन लाख रुपये फायदा होणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी आणि किसान क्रेडिट कार्ड शिवाय, पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून क्रेडिट कार्डची सुविधा दिली जाते. या कार्डला पशु किसान क्रेडिट कार्ड असे म्हटले जाते. याच कार्डच्या माध्यमाने आपल्याला 3 लाख रुपयांचा फायदा मिळेल.
या योजनेअंतर्गत देशांमध्ये दूध दुधाचे पदार्थ व मास या तिन्ही गोष्टींची कमतरता होणार नाही. याची निश्चिती केंद्र सरकार करत आहे. यामधून दुधाचे पदार्थ दूध व मासाची मागणी वाढल्यास शेतकऱ्यांकडून ती घेतली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती सोबतच अजून उत्पन्न मिळणार आहे. Pashu Kisan Credit Card