शेतकऱ्यांनी तापी’च्या कार्यकारी संचालकांची खुर्ची केली जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । शिरसाेलीत शासकीय प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या भूसंपादित केलेल्या जमिनीचा वाढीव माेबदला देण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी न केल्याने तापी विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांची खुर्ची व संगणक कार्यकारी अभियंता पठार यांच्या उपस्थितीत गुरुवारी रोजी दुपारी जप्त करण्यात आली.

शिरसाेली येथील निजामाेद्दीन समसाेद्दीन पिंजारी, रवींद्र नथ्थू पाटील, रामा नेटके व देविदास बारी आदी शेतकऱ्यांची जमीन तापी महामंडळाने संपादित केली हाेती. त्याचा पहिला माेबदला दिला हाेता; परंतु, वाढीव माेबदल्याचे न्यायालयाने आदेश देऊनही महामंडळाने माेबदला दिला नाही म्हणून शेतकरी न्यायालयात गेले हाेते. न्यायाधीश एस.के. उपाध्याय यांनी २२ नाेव्हेंबर राेजी जप्तीचा हुकूमनामा काढला. त्यानुसार सकाळी साडेअकरा वाजता संबंधित शेतकरी, त्यांचे वकील ऍड.एस.झेड. पाटील व न्यायालयाचे बेलीफ यांनी तापी महामंडळात जाऊन कार्यकारी संचालकांचे दालन गाठले; परंतु, ते नसल्याने त्यांच्या अनुपस्थितीत कार्यकारी अभियंता पठार यांच्या उपस्थितीत कार्यकारी संचालकांची खुर्ची व संगणक जप्त केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज