तलाठ्यांच्या कामबंद आंदोलनाने शेतकरी, विद्यार्थ्यांना मनस्ताप

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । पुणे येथील प्रकल्प राज्य समन्वयक रामदास जगताप यांच्या बदलीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी व मंडळ अधिकारी महासंघाने १३ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे शैक्षणिक, उत्पन्नाचे दाखले, सातबारे उतारे वितरण बंद झाले यामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्र राज्य तलाठी व मंडळ अधिकारी महासंघाने पुणे येथील प्रकल्प राज्य समन्वयक रामदास जगताप यांच्या बदलीसाठी १३ ऑक्टोबरपासून नैसर्गिक आपत्ती व निवडणूक विषयक कामे वगळून काम बंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे शैक्षणिक व उत्पन्नाचे दाखले, सातबारे उतारे वितरण बंद आहे. परिणामी भुसावळ तहसील कार्यालय व ग्रामपातळीवरील तलाठी कार्यालयात नागरिकांना फेऱ्या माराव्या लागत आहेत.

आंदोलनाची शासन स्तरावरुन दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी लागणारे दाखले मिळत नाही. उत्पन्नाच्या दाखल्यावर देखील तलाठी स्वाक्षरी करत नाहीत. भुसावळ तालुक्याचे निवासी नायब तहसीलदांचा थंब व डिजिटल स्वाक्षरी नसल्याने दाखले निर्गमित होत नाहीत. याबाबत शिवसेनेचे विभागप्रमुख अमोल पाटील यांनी तलाठी महासंघाच्या मागण्यांचा विचार करावी, अशी मागणी केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज