कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी महिलेची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । मेहेरगाव ( ता. अमळनेर ) येथील महिला शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्त्महत्या केल्याची घटना २१ रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली. कोकीळाबाई संजय पाटील (वय ४७,) असे या महिलेचे नाव आहे.

मेहेरगाव येथील कोकीळाबाई संजय पाटील या महिलेचे पिळोदा येथील सुधाकर दत्तात्रय साळुंखे यांच्या मेहेरगाव शिवारातील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. कोकिळाबाई यांच्याकडे ७ एकर शेती होती. त्यांच्यावर सोसायटीचे दोन लाख पीक कर्ज तर खासगी सावकाराचे चार ते पाच लाख रुपये कर्ज होते. यामुळे त्या त्रस्त होत्या. कर्ज कसे फेडायचे याची त्यांच्यापुढे चिंता होती.

कर्जापोटी विकली शेती

कर्ज फेडावे लागणार म्हणून, त्यांनी गेल्या वर्षी शेती विकली गेली होती. त्यानंतर त्या अधिकच अस्वस्थ असत. कर्जापोटी कोकीळाबाईने आत्महत्या केल्याचे सरपंच राकेश ठाकरे यांनी सांगितले. महिलेचे दिर सुरेश देविदास पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोकीळाबाईचे शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात आणले आहे. तिच्या पश्चत पती व दोन अविवाहित मुले असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज