fbpx

कुसुंबा शिवारातून शेतकऱ्याची दुचाकी चोरी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२१ । कुसुंबा येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याची दुचाकी शेतीच्या बांधावरुन चोरी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुसुंबा येथील शेतकरी रामकृष्ण भास्कर पाटील हे दि.११ रोजी सुरेशदादा नगरात शेतात गेले होते. दुपारी त्यांनी स्वतःची दुचाकी क्रमांक एमएच.१९.बीटी.९४६२ ही रस्त्यावर बांधाजवळ लावली होती. शेतातून शेंगा तोडून परत आल्यानंतर त्यांनी पाहिले असता दुचाकी दिसून आली नाही. आपली दुचाकी चोरी झाल्याची खात्री पटल्याने त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज