fbpx

पळासखेडे येथे शेतकऱ्यावर गोळीबार, भाऊ, आईला मारहाण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे शेतीच्या बांधाच्या वापरावरून एका शेतकऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली.

अशोक शिवाजी पाटील असे गोळीबार करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या गोळीबारात अशोक पाटील हे जखमी झाले आहे. त्यांना त्यांच्यावर जळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, वाद सोडवण्यासाठी गेलेले भाऊ किशोर शिवाजी पाटील व आई सुशिलाबाई पाटील यांना देखील मारहाण करण्यात आली. हल्ला विजय दोधा पाटील या व्यक्तीने केला असून त्याने तीन ते चार गोळ्या फायर केल्याचे जखमीचे म्हणणे आहे.
https://fb.watch/728gwqfzMP/

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt