fbpx

पिंपळगावात पिकांचे मोठे नुकसान

mi-advt

 जळगाव लाईव्ह न्यूज | तूषार देशमुख | जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेले पिंपळगाव म्हणजेच गेल्या आठ महिन्यांपूर्वी जम्मू येथे अतिरेकी हल्यामध्ये वीरगती प्राप्त झालेला तसेच संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे नाव देशात उंचावणारा शहीद यश देशमुख याच्या पिंपळगाव या गावांमध्ये दोन दिवसापासून झालेल्या संततधार पावसामुळे पिकांचे अक्षरश खूप मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांची वर्षभराची कमाई मातीमोल झाली.

चाळीसगाव तालुक्यात दोन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. त्याचा परिणाम पिंपळगाव, रोहिणी तसेच आजूबाजूच्या गावांच्या शेतजमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले व शेतकऱ्यांनी लावलेले कारले, मिरची, कांद्याचे रोप, पपई, टमाटे तसेच इतर पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली. पिंपळगावातून चाळीसगाव कडे येणारा रोहिणी या गावाजवळच्या पुलावरून देखील पाणी सुरू होते. त्यामुळे गावाचा आणि शहराचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. पिंपळगावच्या शेतकऱ्यांनी पावसामध्ये आपल्या जमिनींची पाहणी केली. तसेच शक्य तेवढया प्रमाणामध्ये शेतामधून पाण्याला वाट मोकळी करून दिली. मात्र पावसाचा जोर जास्त असल्यामुळे शेत जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले व शेतकऱ्यांच्या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले.

 

या पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेण्यासाठी पिंपळगावचे उपसरपंच सौ पद्मजा धनंजय देशमुख तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल देशमुख यांनी संपूर्ण गाव परिसरातील शेताची पाहणी केली.आणि झालेल्या नुकसानीची कल्पना तलाठी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील धीर दिला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज