शेतातील फवारणी जीवावर बेतली, शेतकऱ्याचा विषबाधेने मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२१ । पाचोरा तालुक्यातील नांद्रा शेतात फवारणी करतांना विषबाधा झाल्याने शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना दि.२७ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.

नांद्रा येथील शेतकरी लक्ष्मण दामू सूर्यवंशी (वय-६३) हे दि.२७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात कपाशीवर पडलेल्या विविध रोगराईवर उन्हात विषारी औषध फवारणी करीत होते. फवारणी दरम्यान त्यांना औषधीची विषबाधा झाली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत लक्ष्मण सूर्यवंशी यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली असा परीवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar