fbpx

कर्जबाजारीपणाला कंटाळून नागदुली येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ मे २०२१ । कर्जबाजारीपणाला कंटाळून ३८ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एरंडोल तालुक्यातील नागदुली येथे आज गुरुवारी सकाळी उघडकीस आलीय.  पिरण बुधा पाटील (वय 38) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

याबाबत असे की, नागदुली येथील पिरण  पाटील यांचेकडे तीन एकर शेती होती.पिरण पाटील यांचे आई वडील यांना कोरोना झाला होता.सुमारे एक महिन्यापूर्वी वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर आई कोरोनावर मात करून घरी आल्या होत्या.सततची नापिकी,आई वडिलांच्या उपचारावर झालेला खर्च यामुळे ते तणावाखाली होते.पिरण पाटील यांचेवर सोसायटीचे तसेच खाजगी कर्ज होते.सोसायटीचे कर्ज व खाजगी व्यक्तींकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे या तणावाखाली असलेल्या पिरण पाटील यांनी आज सकाळी सात वाजेच्या सुमारास नागदुली येथे किराणा दुकानात गळफास घेवून आत्महत्या केली.

mi advt

पिरण पाटील यांचे चुलत भाऊ भूषण हिलाल पाटील हे त्याच्या शेतात गेले असताना अमोल महाजन आणि सतीश माळी यांनी त्याना पिरण पाटील यांनी गळफास घेतल्याचे सांगितले.भूषण पाटील यांनी माहिती मिळताच घराकडे धाव घेतली.गावातील  नागरिकांनी पिरण पाटील यास खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तो मयात झाल्याचे सांगितले.

याबाबत भूषण पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करोत आहेत.मयात पिरण पाटील यांचे पच्छात आई,भाऊ,पत्नी,तीन मुली आणि घटस्फोटीत मनोरून बहिण असा परिवार आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज