fbpx

आंबेवडगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ एप्रिल २०२१ ।  पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील ३९ वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल ५ रोजी उघडकीस आली. रायबा तानाजी हटकर (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

मृत हटकर यांच्या पत्नीचे एक वर्षापूर्वी अल्पश: आजाराने निधन झाले होते. हटकर यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी व दोन लहान मुले आहेत. संसाराचा गाडा ओढतांना घरात स्वयंपाक, धुणीभांडी अशी कामे त्यांनाच करावी लागत होती. अडीच एकर कोरडवाहू शेतजमीन असल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असलेल्या ते काही दिवसांपासून नैराश्यात होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt