शेतकऱ्याची कर्जबाजरी पणाला कंटाळून आत्महत्या

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । सातगाव (डोंगरी) ता.पाचोरा येथील अशोक लांडगे (वय ४०) या  शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना १३ रोजी घडली.या प्रकरणी येथील पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशोक लांडगे यांच्याकडे दोन एकर शेतजमीन आहे. त्यांच्या आईच्या नावे महाराष्ट्र ग्रामीण विकास बँकेचे ७७ हजार रुपये कर्ज तसेच पत्नीच्या नावे बचत गटाचे ९० हजार रुपये कर्ज असल्याचे समजते.त्याची परतफेड कशी कारवी ही विवंचना व नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -