किनगाव येथे साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन शेतमजुराची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील किनगाव येथील ४० वर्षीय शेतमजूराने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी घडली असून भगवान रघुनाथ पाटील (वय-४०) असे आत्महत्या करणाऱ्या मजुराचे नाव आहे. दरम्यान, त्यांनी आत्महत्या का केली? याबाबत अद्यापही कळू शकले नाही. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, किनगाव खुर्द येथील साईबाबा मंदीर परिसरात राहणारे भगवान पाटील हे पत्नी व मुलगा यांच्यासह राहतात.दरम्यान, आज सकाळी त्यांची पत्नी व मुलगा शेतात कामाला गेला असता त्यांनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या छताच्या पडतीला साडीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजून आले नाही. यापुर्वी भागवत पाटील यांनी विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलीस पाटील दिलीप साळुंके यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ . बी बी बारेला यांनी केले. पुढील तपास तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे. मयत भगवान पाटील पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगा असा परिवार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज