fbpx

डोंगरकठोरा येथे शेतमजुराची आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२१ ।  यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील एका शेतमजुराने विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. भागवत बळीराम शिरोळे (धनगर) असे आत्महत्या केलेल्या शेत मजुराचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत असे की, भागवत शिरोळे यांनी आज दुपारी खालचे गाव लगत शिवारातील शालीक रामचंद्र फिरके यांच्या शेतातील विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली. गावातील पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांच्या मदतीने मयत भागवत शिरोळे यांचा  मृतदेह विहीरीतुन काढण्यात आला.  

यावलच्या ग्रामीण रुग्णालयात मयताचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आण्यात आले आहे. मयत भागवत शिरोळे याच्या मृत्यु पश्चात पत्नी व दोन मुल असुन, कोरोना संसर्गाच्या काळात मयत आणि  त्याची पत्नी हे कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक माहीतीत समोर आली आहे. यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज