⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | चाळीसगाव तालुक्यातील शेत पाणंद रस्ते होणार चकाचक ; राज्य शासनाने केला निधी मजूर

चाळीसगाव तालुक्यातील शेत पाणंद रस्ते होणार चकाचक ; राज्य शासनाने केला निधी मजूर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । ८ एप्रिल २०२२ । तालुक्यातील १०० किलोमीटर रस्त्यांची कामे मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ता योजनेतून व्हावीत, अशी मागणी आमदार चव्हाण यांनी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीला यश आले असून १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे लवकरच शेत पाणंद रस्त्यांचे भाग्य उजळणार असून चाळीसगावच तालुक्यातील रस्ते चकाचक होणार आहेत.

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आग्रही व आक्रमक भूमिका घेणारे मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या दळणवळण व अर्थकारणाला चालना देणाऱ्या अतिशय महत्वाच्या प्रश्नासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला आहे. शेतकऱ्यांना शेतात जाता येता यावे, त्यांचा शेतीमाल सहजरीत्या घरी व बाजारपेठेत पोहोचावा यासाठी शेतरस्ते दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे केली जात होती. त्यानुषंगाने आमदार चव्हाण यांनी राज्य शासनाकडे तालुक्यातील १०० किमीच्या रस्त्यांची कामे मातोश्री शेत पाणंद रस्ते योजनेतून करण्यात यावी यासाठी रोजगार हमी मंत्री ना.संदीपान भुमरे यांच्याकडे मागणी केली होती. आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नांनी पहिल्या टप्प्यात चाळीसगाव तालुक्यातील ४० किमीच्या शेत पाणंद रस्त्यांसाठी १० कोटीं रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे गेली अनेक वर्ष खराब अवस्थेत असणाऱ्या ४० शेत रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. पुढील टप्यात येत्या काही दिवसातच अजून ६ किमीच्या रस्त्यांना १५ कोटी रुपये मंजूर होणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयातून देण्यात आली आहे.

मंजूर झालेले चाळीसगाव तालुक्यातील ४० शेत पाणंद रस्ते पुढीलप्रमाणे –

१ – पाटणा पानदेव पासून ते फोरेस्ट हद्दी पर्यंत – १ किमी

२ – डोण दिगर महादेव मंदिर ते रामराव गोसावी यांच्या शेतापर्यंत – १.५ किमी

३ – चांभार्डी खुर्द पिरोबा पांधी रस्ता – १ किमी

४ – देवळी देवळी डोन रस्ता ते माणिक अर्जुन यांच्या शेतापर्यंत शिवरस्ता खडीकरण करणे – १ किमी

५ – पिंप्री बु.प्रदे भिल्ल वस्ती ते जुगराज मुरलीधर यांच्या शेतापर्यंत शिवरस्ता खडीकरण करणे – १ किमी

६ – तरवाडे बु. भास्कर सुकदेव बोराळे ते साजन केदार यांच्या शेतापर्यंत – १ किमी

७ – ढोमणे स्मशानभूमी पासून ते श्री आर डी पाटील यांच्या शेतापर्यंत शिवरस्ता खडीकरण करणे – १ किमी

८ – तांबोळे बु. भाऊसाहेब नारायण पाटील ते सविता किशोर जाधव यांच्या शेतापर्यंत – १

९ – ओझर ओझर ते वाघडू शिवरस्ता खडीकरण करणे – २ किमी

१० – आडगाव मालेगाव रोड ते दादाभाऊ जामराव मगर यांच्या शेतापर्यंत – १ किमी

११ – जामडी जागृती विजय परदेशी यांच्या शेतापासून ते लक्ष्मीबाई पोपट भिल यांच्या शेतापर्यंत – १ किमी

१२ – डामरून रोहिदास साहेबराव पाटील यांच्या शेतापासून ते सोपान चिमणराव यांच्या शेतापर्यंत – १ किमी

१३ – पळासरे दगडू ताराचंद देवकर यांच्या शेतापासून ते कैलास भास्कर पाटील यांच्या शेतापर्यंत – १ किमी

१४ – खडकी बु. कोदगाव शिव रस्ता – संभाजी प्रताप मांडोळे ते भगवान तुकाराम शिंदे यांच्या शेतापर्यंत – १ किमी

१५ – टाकळी प्रचा विजय भिवसन गुजर यांच्या शेतापासून ते विश्वनाथ रामचंद्र स्वार यांच्या शेतापर्यंतचा रस्ता – १ किमी

१६ – धामणगाव नाना रतन यांच्या शेतापासून ते रामनाथ धर्मा यांच्या शेतापर्यंत शिवरस्ता खडीकरण करणे – १ किमी

१७ – कळमडू अशोक घेवरजी वंजारी ते नबाबाई वाल्मिक केदार यांच्या शेतापर्यंत – १ किमी

१८ – कुंझर रामबंथी ते रामदास महाले यांच्या शेतापर्यंत – १ किमी

१९ – अंधारी रमेश पांडू आव्हाड यांच्या शेता पासून शरद मोरे यांच्या शेता पर्यंत – १ किमी

२० – तिरपोळे पाझर तलाव ते वरखेडे तिरपोळे मेन रोड पर्यंत शिवरस्ता खडीकरण करणे – १ किमी

२१ – पिंपरखेड वाल्झेरी फाटा ते बेलदारवाडी शिवरस्ता खडीकरण करणे ०.५ किमी

२२ – चिंचगव्हाण जगन मांगू चव्हाण यांच्या शेतापासून ते चारी नंबर ९ पर्यंत (सुंदर नगर) रस्ता शिवरस्ता खडीकरण करणे – १ किमी

२३ – दहीवद रमेश भालेराव वाघ यांच्या शेतापासून ते जिभाऊ आनंदा वाघ यांच्या शेतापर्यंत शिवरस्ता खडीकरण करणे – १ किमी

२४ – खडकीसीम रामभाऊ दादाजी पाटील यांच्या शेतापासून ते विक्रम बळीराम पाटील यांच्या शेतापर्यंत – १ किमी

२५ – करगाव नामदेव गबा यांच्या शेतापासून ते अमर सुपडू यांच्या शेतापर्यंत – १ किमी

२६ – इच्छापूर जगराम शिवराम राठोड यांच्या शेतापासून ते नामदेव जयसिंग राठोड यांच्या शेतापर्यंत – १ किमी

२७ – टाकळी प्रदे सखाराम झिपरू पाटील ते विठल सुपडू मगर यांच्या शेतापर्यंत – १ किमी

२८ – दस्केबर्डी हेमांगी अर्जुन माळी ते दिपक लक्ष्मण माळी यांच्या शेतापर्यंत ०.५ किमी

२९ – खेडी दत्त मंदिर ते पोहरा रस्ता आडी वाट पर्यंत – १ किमी

३० – खेडगाव जुवार्डी रस्ता मधुकर त्र्यंबक साळुंखे यांच्या शेतापासून ते सुभाष केशव साळुंखे यांच्या शेतापर्यंत – १ किमी

३१ – गणेशपूर अर्जुन बंकट पाटील ते देवरे डी.पी. पर्यंत – १ किमी

३२ – चिंचखेडे बाळू गबा भिल्ल यांच्या शेतापासून ते चिंतामण नथ्तु पाटील यांच्या शेतापर्यंत – १ किमी

३३ – पिंपळवाड म्हाळसा आणणा पुंडलिक महाले ते धर्मा पांडू माळी यांच्या शेतापर्यंत – १ किमी

३४ – अलवाडी रामदास दामू कांबळे ते प्रेमराज विनायक पाटील यांच्या शेतापर्यंत – १ किमी

३५ – खेर्डे ज्ञानेश्वर चिंध चावण यांच्या शेतापासून ते सुभाष त्र्यंबक यांच्या शेतापर्यंत – १ किमी

३६ – घोडेगाव शिवाजी शंकर हाडपे ते बाबू बंडू राठोड यांच्या शेतापर्यंत – १ किमी

३७ – खरजई मारोती मोरे ते धनराज पाटील यांच्या शेतापर्यंत – १ किमी

३८ – एकलहरे एकलहरे ते वसंत महादू पाटील यांच्या शेतापर्यंत – १ किमी

३९ – कोदगाव गणपूर येथील कैलास पुंडलिक यांच्या शेतापासून ते कोदगाव धरणाकडे येणारा शिवरस्ता – १ किमी

author avatar
टीम जळगाव लाईव्ह