नवरदेवाच्या कारची धडक, दुचाकीस्वार कुटुंबीय जखमी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । वरणगाव राष्ट्रीय महामार्गावर बोहर्डी गावाजवळ भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. त्यात एकाच कुटुंबातील तीन गंभीर जखमी झाली. ही घटना साेमवारी दुपारी १२ वाजता निर्मल हॉटेलसमोर घडली. पती-पत्नी दाेघांना उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले. असून, वरणगाव पोलिसांनी कार चालक हारुण शेख याला ताब्यात घेतले.

मुक्ताईनगरकडून येणाऱ्या एमपी.६३-सी.३१५६ या क्रमांकाच्या कारचा चालक हरुण मुश्ताक शेख (वय २५, रा.बऱ्हाणपूर) हा नवरदेवाला भुसावळ येथे घेवून जात हाेता. बोहर्डी गावाजवळ एमएच.१९-एक्स.२१९५ या क्रमांकाच्या दुचाकीवरून महेंद्र दामोदर भंगाळे (वय ४५), त्यांची पत्नी गायत्री व मुलगी मानसी (रा.खिर्डी खुर्द, ता.रावेर) हे बोहर्डीजवळ महामार्ग ओलांडत होते. यावेळी मागून येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र पती, पत्नी दाेघे गंभीर जखमी झाले. त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात व तेथून जळगावच्या गोदावरी हाॅस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. वरणगाव पोलिसांनी कार चालक हारुण शेख याला ताब्यात घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -