पत्नीस पाणी आणण्यासाठी गेलेल्या पतीचा विहिरीत पडून मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे पत्नीस पाण्याची तहाण लागल्याने विहिरीत पाणी काढण्यासाठी गेलेल्या पतीचा पाय घसरुन विहिरीत पडल्याने मृत्यु झाल्याची घटना उघडकीस आली. कैलास सखाराम महाजन मृताचे नाव आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

याबाबत असे कि, पत्नीस पाण्याची तहाण लागल्याने कैलास महाजन हे विहिरीत पाणी काढण्यासाठी गेले. दरम्यान, गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे व विहीर कच्ची असल्याने कैलास महाजन यांचा पाय घसरून विहीरीत पडले.विहीरीत २० ते २५ फुट पाणी असल्याने त्याचा मृत्यू झाला.

विहीर ही येथील भेंडीच्या शेतापासुन जवळच असल्याने त्याचे पत्नीस विहीरीत काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने तिचा पती पडल्याचे निदर्शनास आले. पत्नीने गावातील नागरिकांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती कळविली. मात्र गावातील नागरिक घटनास्थळी पोहचे पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. कैलास सखाराम महाजन असे मयत इसमाचे नाव असुन, त्यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. त्यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडील, पत्नी व तीन मुली आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज