fbpx

Fact Check : सोमवारपासून पुन्हा कडक निर्बंध? पहा काय म्हणाले जिल्हाधिकारी

mi-advt

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२१ । सोशल मीडियात ‘सोमवारपासून पुन्हा कडक निर्बंध’ अशी बातमी सध्या व्हायरल होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने हा निर्णय घेतल्याचे त्यात नमूद करण्यात येत असले तरी ही निव्वळ अफवा असल्याचे माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जळगाव लाईव्हला दिली आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असून शासन दिवसेंदिवस निर्बंध अधिक शिथील करीत आहे. दरम्यान, शनिवारपासून सोशल मीडियात एका बातमीचे कात्रण व्हायरल होत असून ‘सोमवारपासून पुन्हा कडक निर्बंध’ असा त्यात स्पष्ट उल्लेख आहे. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या बातमीमुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव लाईव्ह न्यूजने याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ‘सोशल मीडियात व्हायरल होणारे कात्रण हे जुने असून कडक निर्बंध ही अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt