fbpx

आरटीई प्रवेश अर्जासाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ३० मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ९१० विद्यार्थ्यांनी आतापर्यंत ऑनलाईन अर्ज सादर केले आहे.

ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया ३ मार्चपासून सुरू झाली आहे. शिक्षण विभागाने प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत २१ मार्चपर्यंत निश्चित केली होती. आरटीई अंतर्गत ३ हजार ६५ जागा आरक्षित हाेणार असून, जिल्ह्यातील २९६ शाळांची नाेंदणी झाली आहे. दरम्यान, १८ दिवसांत ४ हजार ९१० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू असताना दोन वेळा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे ८ ते १० दिवस प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली होती. ओटीपीची तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. पालकांना ऑनलाईन अर्जासाठी २१ मार्चपर्यंत विहित मुदत देण्यात आली होती ती वाढवून आता ३० मार्चपर्यंत केली आहे. त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज