fbpx

प्रवाशांनो लक्ष द्या ! भुसावळातून जाणाऱ्या ‘या’ विशेष गाड्यांना मुदतवाढ, जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२० पासून रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर १ जून २०२० पासून देशभरात विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या. दरम्यान, रेल्वेत सणासुदीत होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मध्य रेल्वेने पुढील आदेशापर्यंत खालील विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे:

०२१०७ लोकमान्य टिळक टर्मिनस – लखनऊ विशेष (सोमवार, बुधवार, शनिवार) दि. १.११.२०२१ ते ३०.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०२१०८ लखनऊ- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (मंगळवार, गुरुवार, रविवार) दि. २.११.२०२१ ते ३१.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०२१६५ लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपूर विशेष (सोमवार, गुरुवार, शुक्रवार) दि. २९.१०.२०२१ ते ३१.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ

०२१६६ गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (मंगळवार, शुक्रवार, शनिवार) दि. ३०.१०.२०२१ ते १.४.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०१०७९ लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष (गुरुवार) दि. ४.११.२०२१ ते ३१.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०१०८० गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (शनिवार) दि. ६.११.२०२१ ते २.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०२१०१ लोकमान्य टिळक टर्मिनस – शालीमार (सध्या हावडा) विशेष (सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार) दि. १.११.२०२१ ते २९.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०२१०२ शालीमार (सध्या हावडा) – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (सोमवार, बुधवार, गुरुवार, रविवार) दि. ३.११.२०२१ ते ३१.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०१०३३ पुणे-दरभंगा विशेष (बुधवार) दि. ३.११.२०२१ ते ३०.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०१०३४  दरभंगा-पुणे विशेष (शुक्रवार) दि. ५.११.२०२१ ते १.४.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०१४०७  पुणे- लखनऊ विशेष (मंगळवार) दि. २.११.२०२१ ते २९.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०१४०८ लखनऊ- पुणे विशेष (गुरुवार) दि. ४.११.२०२१ ते ३१.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०१११५ पुणे- गोरखपूर विशेष (गुरुवार) दि. ४.११.२०२१ ते ३१.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०१११६ गोरखपूर- पुणे विशेष (शनिवार) दि. ६.११.२०२१ ते २.४.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०२१३५ पुणे- मांडुआडीह विशेष (सोमवार) दि. १.११.२०२१ ते २८.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०२१३६ मंडुआडीह- पुणे विशेष (बुधवार) दि. ३.११.२०२१ ते ३०.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०२०९९ पुणे- लखनऊ विशेष (मंगळवार) दि. २.११.२०२१ ते २९.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

०२१०० लखनऊ- पुणे विशेष (बुधवार) दि. ३.११.२०२१ ते ३०.३.२०२२ पर्यंत चालवण्यासाठी मुदतवाढ.

दि. २.११.२०११ पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणारी ट्रेन क्र.02101 आता शालिमार येथे संपुष्टात येईल आणि दि. ४.११.२०२१ पासून शालीमार येथून सुटेल. या विशेष गाड्यांच्या संरचना, थांबे आणि वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज