बोढरे परिसरात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । बोढरे ( ता. चाळीसगाव ) येथे अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथे ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह आज दुपारी २ : ३० वाजेच्या सुमारास  आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मयताची ओळख अद्याप पडलेली असून या घटनेबाबत पोलीस पाटील राजेंद्र पाटील यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना कळविले आहे. या क्षणातच ते घटनास्थळी दाखल होणार आहेत. त्यानंतर सदर मृतदेहेला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज