fbpx

प्रत्येकाने कर्तव्यभावना जपावी – गुलाबराव देवकर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑगस्ट २०२१शहिदांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर भारताने प्रत्येक क्षेत्रात चौफेर प्रगती केली. त्याची फळे आपण आज चाखत आहोत. परंतु, ही गोड फळे चाखत असताना देशाप्रती असलेल्या आपली कर्तव्यभावनाही प्रत्येकाने जपणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले.

स्वातंत्र्यदिनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त श्री गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात देवकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी देवकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्यावर आधारित हस्तलिखिताचे प्रकाशन श्री देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी यावेळी देशभक्तीपर मनोगत व्यक्त केले.
यावेळी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डीन डॉ. द्वारकाधीश निकुंभ, मजूर फेडरेशनचे सभापती लिलाधर तायडे, देवकर अभियांत्रिकीचे प्राचार्य प्रा. सी. एस. पाटील, तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य डॉ. एम. पी. पाटील, अभियांत्रिकीचे रजिस्ट्रार डॉ. विकास निकम,  फार्मसीचे प्राचार्य डॉ. योगेश पवार, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. नितीन पाटील, देवकर मल्टिस्पेशालिटी व आयुष रुग्णालयाचे ॲडमिनिस्ट्रेटर डॉ. नितीन पाटील, क्रीडा अधिकारी प्रा. किरण नेहते व तंत्रनिकेतनचे विभागप्रमुख डॉ. शीतलकुमार देशमुख कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज