अंदाज : ८ हजारांवर भाव स्थिर पण १५ लाख कापूस गाठींचे उत्पादन शक्य

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ ।  खान्देशात यंदाच्या खरीप हंगामात १५ लाख कापूस गाठीचे उत्पादन हाेईल. भावही साडेसात हजार ते साडे आठ हजार रुपये प्रतिक्विंटल राहतील, असा अंदाज खान्देश जिनिंग आणि  प्रेसिंग फॅक्टरी ओनर्स असाेसिशएशनच्या बुधवारी झालेल्या बैठकीत वर्तवण्यात आला आहे.
यंदाच्या हंगामात कापसाचे उत्पादन कमी हाेईल. खान्देशात १५ लाख कापूस गाठी, महाराष्ट्रात ७५ ते ८० लाख कापूस गाठी तर देशभरात ३ काेटी ३० लाख ६० हजार कापूस गाठींचे उत्पादन निघण्याची शक्यता असल्याची चर्चा बैठकीत करण्यात आली. यावेळी काॅटन असाेसिएशन ऑफ इंडियाचे डायरेक्टर म्हणून, ज्ञानेश्वर भांबरे यांची एकमताने शिफारस करण्यात आली.

यांची उपस्थिती होती 

जळगाव जिल्ह्यात आवश्यक असलेल्या काॅटन टेस्टिंग लॅबची गरज पूर्ण केल्याबद्दल काॅटन असाेसिशएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांचे आभार मानण्यात आले. सभेत कापसावर येणाऱ्या बाेंडअळीच्या नियंत्रणाबाबत कृषी उपसंचालक अनिल भाेकरे यांनी मार्गदर्शन केले. संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जैन, अरूण खेतान, दिनकर शिंपी, जे. सी. पाटील, हरिश अग्रवाल, ज्ञानेश्वर भांबरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित हाेते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज