एरंडोलच्या योगेश्वरी मराठेची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेत निवड

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२१ । दहिवेल येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन विद्यापीठ स्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये योगेश्वरी अनिल मराठे हिचा ६२ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून भजनलाल चौधरी वरिष्ठ महाविद्यालय भिवनी राज्य (हरियाणा) या ठिकाणी होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून एरंडोल शहराचा इतिहास घडवून या संस्थेचा इतिहास रचला आहे.

राष्ट्रीय स्पर्धा, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धा, महाराष्टाच्या पदक तालिकेत कास्यपदक मिळविण्याचा, शालेय स्पर्धेत सिल्वर पदक मिळवण्याचे मान योगेश्वरी मराठे हिला मिळाले असून तिला मार्गदर्शक म्हणून गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष व कुस्ती कोच भानुदास आरखे व अनिल मराठे वस्ताद यांचे मार्गदर्शन लाभले.

डि.डि.एस.पी कॉलेजमधून एरंडोल प्राध्यापक के.जी वाघ सर, प्राध्यापक मनोज पाटील सर, यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले व त्यांचे अभिनंदन म्हणून अँड. किशोर काळकर, अमित पाटील, अध्यक्ष य.च शिक्षण प्रसारक मंडळ एरंडोल, संजय काबरा बालाजी उद्योग समूह , पंकज काबरा आदींनी यावेळी अभिनंदन केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -