सलग ७२ तास सराव करून एरंडोलच्या पैलवानांनी केला रेकॉर्ड

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल शहरातील चंदनगुरू व्यायम शाळेचे मल्ल पैलवान दिपक महाजन व पैलवान सुनील महाजन यांनी सलग ७२ तास सराव करून ‘मिशन गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद केली आहे. मध्यप्रदेशातील देवास येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

मध्यप्रदेशातील देवास येथील श्रीमंत तुकोजीराव पवार स्टेडियम येथे येथे दि.२९ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत एरंडोल शहरातील चंदनगुरू व्यायम शाळेचे मल्ल पै. दिपक महाजन व पै. सुनील महाजन यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत त्यांनी सलग ७२ तास सराव करून ‘मिशन गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ पूर्ण केला.

त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, भारती महाजन, एरंडोल तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संजय महाजन, माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रमेश महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, विजय पाटील, रहीम शेख, प्रा.आर.एस. पाटील, डी.एस. पाटील, प्रशांत महाजन, विकास पैलवान, प्रकाश चौधरी, सतिष पैलवान, उमेश पाटील, नाना पैलवान, योगराज पैलवान आदींनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज