एरंडोल येथील युवकाचा सौदी अरेबीयात सन्मान

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । एरंडोल येथील गांधीपुरा भागातील मूळ रहीवासी तथा सौदी अरेबीयात ‘अल्फनार, गृप ऑफ कंपनीत तांत्रिक व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले दिपक नथ्थू चौधरी यांनी २०२१ या वर्षात तांत्रिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कंपनीचे उपाध्यक्ष व सामान्य व्यवस्थापक यांच्या हस्ते सर्वोत्तम मानाचे व अव्वल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

ते एरंडोल येथील माजी उपनगराध्यक्ष नथ्थू सखाराम चौधरी यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत. या आधीही सन २०१९ मध्ये कंपनीकडुन त्यांना याच पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी कंपनीच्या विस्तारासाठी वेळोवेळी भरीव योगदान दिल्यामुळे कंपनीने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सौदी अरेबीयातील दमाम प्रांतातील जुबेल शहरात समारंभपूर्वक सन्मान करण्यात आला.त्यांच्या या सन्मानामूळे एरंडोल करांची मान उंचावली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -