fbpx

एरंडोल तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल 99.94%

mi-advt

 जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२१ । इयत्ता दहावीचा तालुक्याचा निकाल 99.94% लागला आहे दरम्यान कल्पना समाधान पाटील ( रवंजे) या विद्यार्थिनीचे आकस्मित निधन झाले तिचे इयत्ता नववीचे गुण प्रविष्ट झाले होते परंतु इयत्ता दहावीच्या गुणांचे मूल्यमापन न झाल्यामुळे तालुक्‍याचा निकाल शंभर टक्के च्या आत लागला आहे.

बी.के.माध्यमिक विद्यालय आडगाव या शाळेचा निकाल 92.20% टक्के लागला आहे संस्थाध्यक्ष शालिग्राम पाटील व मुख्याध्यापक प्रमोद पाटील चिलानेकर व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे रा.ती.काबरे विद्यालय एरंडोल निकाल शंभर टक्के लागला आहे एसएससी परीक्षेला या शाळेचे 326 विद्यार्थी प्रविष्ट होते ते सर्व उत्तीर्ण झाले.

प्रथम क्रमांक मुक्ताई संजय मराठे या विद्यार्थिनीने मिळवला असून तिला 96.40 टक्के गुण मिळाले हेरंब सुनील महाजन या विद्यार्थ्याने शेकडा 96.20 गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तर तृतीय क्रमांक श्रद्धा फकीरा चौधरी या विद्यार्थिनीला 95.20 टक्के गुण मिळाले या शाळेचे एकशे अकरा विद्यार्थी विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाले मुख्याध्यापिका रोहिणी मानधने व उपमुख्याध्यापिका एस ए पाटील पर्यवेक्षक नरेश डागा व ए आर मालू यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

एरंडोल तालुक्यात 1979 विद्यार्थी फ्रॉम प्रविष्ट होते ते सर्व उत्तीर्ण झाले 494 विद्यार्थी विशेष प्राविण्याने पास झाले प्रथम श्रेणीत 1095 विद्यार्थी यशस्वी झाले द्वितीय सेनेत 189 विद्यार्थी उत्तीर्ण झाले गौरीशंकर माध्यमिक विद्यालय रवंजे या शाळेचा निकाल 98 टक्के लागला आहे तर महात्मा फुले हायस्कूल एरंडोलचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला आहे संस्था अध्यक्ष विजय महाजन व चेअरमन अरुण कुमार माळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे ग्रामीण उन्नती विद्यालयाचा सुद्धा निकाल शंभर टक्के लागला आहे संस्था अध्यक्ष सचिन विसपुते व मुख्याध्यापिका अनुषा चव्हाण यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt