एरंडोल तालुका पत्रकार संघाच्या स्नेहबैठकीत एकजुटीचा संकल्प

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे विजयादशमी दिनी स्नेहबैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत उपस्थित पत्रकारांनी एकजुटीचा संकल्प केला व एकमेकांना पेढा भरवून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

विजयादशमीचे औचित्य साधून एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे दि.१७ रोजी स्नेहबैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या सुरुवातील पत्रकारीतेचे अग्रदूत बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतीमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी शस्त्रपूजनाची अखंड परंपरा जोपासत लेखणी, डायरी व मोबाईलचे पूजन करून व एकमेकांना पेढा भरवून ग्रामीण व शहरातील भागातील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. तालुका पत्रकार संघटनेतील ‘आम्ही सारे भाऊ भाऊ, यापुढेही असेच गुण्यागोविंदाने एकत्र राहू’ असा संकल्प करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष देवीदास सोनवणे हे होते. यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बी.एस. चौधरी, सुधीर शिरसाठ, कैलास महाजन, शैलेश चौधरी, कुंदनसिंग ठाकूर, रोहीदास पाटील, प्रल्हाद पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दिनेश चव्हाण, आबा महाजन, पंकज महाजन, रतन अडकमोल, मनोज ठाकूर, प्रविण महाजन, संजय बागड, ग्रा.पं.सदस्य प्रविण पाटील, उद्योजक अजय महाजन, भिला पाटील, शरद पवार, सामाजिक कार्यकर्ते गोरख चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बी.एस. चौधरी यांनी तर सूत्रसंचालन दीपक बाविस्कर व नितीन ठक्कर यांनी केले. आभार कैलास महाजन यांनी मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज