fbpx

जळगाव जिल्ह्यात वेब मिडिया असोसिएशनची एरंडोल तालुका कार्यकारिणी झाली जाहीर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ ऑगस्ट २०२१ । आज एरंडोल येथे वेब मिडिया असोसिएशन च्या तालुका पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. रजिस्ट्रेशन नं जी बी बी एस डी, मुंबई -284/2020 या संघटनेची प्रथम बैठक आयोजित करण्यात आली होती.पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संघटना राज्यभर कार्यरत असुन वेब मीडिया म्ह्णून एकमेव संघटना आहे. संघटनेचे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशाने, विभागीय अध्यक्ष श्री.अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्री.ईश्वरभाऊ चोरडिया अध्यक्षतेखालील जिल्हा उपाध्यक्ष श्री.योगेश पाटील जिल्हा सचिव श्री. जितेंद्र महाजन, जिल्हा संघटक श्री.कैलास महाजन , जिल्हा खजिनदार प्रा.सुधीर शिरसाठ यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

एरंडोल येथील तालुका पत्रकार व शहर पत्रकार यांच्या बैठकीत सर्वानुमते एरंडोल तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.तत्पुर्वी वेब मिडीया असोसिएशन एरंडोल जिल्हा कार्यकारणी च्या जिल्हा संघटक पदी- कैलास महाजन जिल्हा खजिनदार – प्रा.सुधीर शिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे.

वेब मिडीया असोसिएशन एरंडोल  तालुका कार्यकारणी

तालुकाध्यक्ष – प्रा.नितीन पाटील

तालुका उपाध्यक्ष- शैलेश चौधरी

तालुका उपाध्यक्ष- नितीन ठक्कर

तालुका सचिव- कुंदनसिंग ठाकुर

तालुका सरचिटणीस-गणेश महाजन

तालुका समन्वयक-प्रमोद चौधरी

तालुका संघटक-पंकज महाजन

तालुका खजिनदार –  भुषण बोरसे यांची निवड करण्यात आली आहे.*

वेब मीडिया असोसिएशन एरंडोल तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन व स्वागत होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज