fbpx

एरंडोल तालुक्यात ई-मतदान कार्ड डाऊनलोड करण्याचा कार्यक्रम जाहीर

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२१ । दि . 14 ऑगष्ट 2021 रोजी सकाळी 11:00 ते 12:00 या एक तासाच्या कालावधीत एरंडोल तालुक्यातील मतदारांचे ई-मतदान कार्ड डाऊनलोड करण्याचे कार्य एरंडोल तालुक्यातील गावांच्या प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार केंद्रस्तवरी अधिकारी (BLO) यांचे मार्फत करण्यात येणार आहे.

त्यामुळे मुख्य निवडणुक अधिकारी महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणुक अधिकारी यांचे मार्फत मिळालेल्या सुचनांनुसार मतदारांनी आपला भ्रमणध्वनी ( मोबाईल ) मतदान केंद्रावर सोबत नेऊन आज दि.14 ऑगष्ट 2021 रोजी सकाळी 11:00 ते 12:00 या एक तासाच्या कालावधीत जऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत आपले ई-मतदान कार्ड डाऊनलोक करुन घ्यावयाचे सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt