fbpx

एरंडोल पोलिसांच्या धाडीत चार हजार पाचशे रुपयांची अवैध दारू जप्त

एरंडोल पोलिसांनी पिंपळकोठा येथील कृष्णाई हॉटेलवर शनिवारी धाड टाकली.याठिकाणी त्यांना सोळा देशी दारू व एकोणवीस विदेशी दारू च्या कॉटर्स मिळून आल्या. एकूण चार हजार पाचशे रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली व हॉटेल मालक दिलीप भिमसिंग पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

काशिनाथ पाटील, पंकज पाटील, राहुल बैसाणे, संदीप सातपुते, प्रशांत पाटील यांच्या पथकाने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यवाही केली.

mi advt

शहरात अवैध दारु मोठ्याप्रमाणावर विक्री केली जात असून काही हातगाड्यांवर, शहरातील हायवे व काही रस्त्यांवरील हॉटेल वर सर्रास अवैध दारु मोठ्याप्रमाणावर विक्री केली जात असून त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज