एरंडोल नगरपालिका रोपटे देऊन करणार सत्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल नगरपालिकेकडून माझी वसुंधरा अभियान २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत एक नवीन उपक्रम राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत एरंडोल नगरपालिकेस भेट देणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा एक रोप देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत आस्था महिला मंडळाच्या अध्यक्षा आरती ठाकुर, जागृती महिला मंडळाच्या निता तिवारी, दर्शना तिवारी, संध्या तिवारी, रेवा गुर्जर महिला मंडळाच्या संध्या गुर्जर, शोभा पाटील, उज्वला पाटील, रेणुकामाता ब्राह्मण महिला मंडळाच्या निशा विंचुरकर, लीना जोशी, वंदना, कुलकर्णी, शिल्पा पाठक, वाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा शालिनी कोठावदे यांचा प्रत्येकी एक फळझाड देऊन सत्कार करण्यात आला.

या झाडांचे संगोपन करून त्याचा एक फोटो एरंडोल नगरपरिषदेस पाठवून त्यांची नोंद ठेवण्यात येणार आहे. पाच झाडे लावणाऱ्यांना नगरपालिकेकडून मालमत्ता करात १ टक्का सुट देण्यात येणार आहे. यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे, कार्यालयीन अधीक्षक हितेश जोगी, विवेक कोळी, अनिल महाजन आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज