⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

एरंडोल नगरपालिकेत सफाई कामगार पदाची भरती; पगार १५ ते ४७ हजारापर्यंत

एरंडोल नगरपालिकाअंतर्गत सफाई कामगार (Erandol Municipality Sweepers Recruitment 2021) या पदाकरिता भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२१ आहे.

पदाचे नाव : सफाई कामगार

शैक्षणिक पात्रता :
१) ७ वी उत्तीर्ण
२) मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक
३) लिहिता वाचता येणे आवश्यक
४) न.प.च्या सेवेतील कमाल अनुभव असेल तर प्राधान्य

वयोमर्यादा : या जाहिरातीच्या दिवशी उमेदवार १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ३८ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा व मागासवर्गीय असल्यास ४३ वर्षापेक्षा जास्त नसावा.

वेतन : १५,००० ते ४७,६०० /-

उमेदवारांना सूचना :

१. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्र. बीसीसी-२०१८/प्र.क्र.२७/१६-ब (सी) दि.१९ एप्रिल २०१८ मधील तरतुदीनुसार नमूद पदाकरिता मेहतर व वाल्मिकी व्यक्तींची अनुसूचित जाती करिता वर्ग ४ मध्ये रिकाम्या जागा राखून ठेवलेल्या असल्याने नमूद सफाई कामगार वर्ग-४ या पदाकरिता वाल्मिकी व मेहेतर जात या प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवार पात्र ठरणार नाही.

२. न.प. च्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे ठेके पद्धतीने असलेल्या /न.प.च्या राज्यव्यापी सार्वत्रिक संपामध्ये सहभाग असलेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ५ वर्षाने शिथील करण्यात येईल.

३. जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या-त्या विभाग/कार्यालय प्रमुखाची लेखी परवानगी घेवूनच अर्ज करावा. अशी परवानगी अर्जासोबत सादर करावी. उमेदवारांनी आपले अर्ज आपापल्या विभाग/कार्यालय प्रमुखामार्फत पाठविण्याची आवश्यकता नाही.

४. उमेदवाराने जर निवड प्रक्रियेच्या संदर्भात किंवा कोणामार्फत निवड समितीच्या सदस्यांना अथवा नगरपालिका कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा किंवा इतर गैरमार्गाचा प्रयत्न केल्यास त्यास अपात्र ठरविण्यात येईल. या बाबतीत निवड समितीचा निर्णय अंतीम राहिल.
५. अर्जाचा नमुना व सोबतच्या प्रमाणपत्रांचे नमुने नगरपालिका कार्यालय, एरंडोलच्या संकेतस्थळ https://erandolmahaulb.maharashtra. gov.in यावर उपलब्ध आहेत. त्या नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे सादर करावीत.
६. उमेदवाराने दोन सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत. तसेच त्याचे विरुध्द कुठल्याही न्यायालयात कुठलाही फौजदारी खटला निकाली /चालू किंवा प्रस्तावित नसल्याचे प्रमाणित करावे व त्याचा तपशिल दयावा.
७. विहित नमुन्यात नसलेला आणि अपुर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
८. सफाई कामगारांच्या भरती प्रक्रियेच्या वेळी जास्त प्रमाणात अर्ज प्राप्त झाल्यास योग्य ते निकष लावुन पुढील प्रक्रियेकरिता उमेदवारांची लघुसूची तयार करण्याचे अधिकार सरळ सेवा भरती समितीस राहतील व त्यांचा निर्णय अंतिम राहिल व अशी तयार केलेली लघुसूची नगरपालिका कार्यालय, एरंडोल येथील सुचना फलक व https://erandolmahaulb.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
९. उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीकरिता व परिक्षेस बोलविल्यास स्वखर्चाने हजर रहावे लागेल.
१०. सेवाप्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रक व अन्य महत्वाची सुचना असल्यास त्याची माहिती नगरपालिका कार्यालय, एरंडोलच्या सुचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल परंतु तो बदल वैयक्तिकरित्या कळविण्यात येणार नाही.
११. वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परिक्षेचा दाखला आवश्यक राहिल.

१) अर्ज भरण्या पूर्वी उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद असलेल्या अटी पूर्ण करीत असल्याबाबत प्रथम खात्री करून घ्यावी व त्यानंतरच अर्ज.

महत्वाच्या सूचना :
– या पदभरतीकरिता १०० गुणांची वस्तुनिष्ठबहुपर्यायी लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यात प्रत्येकी २ गुण असलेले ५० प्रश्न असतील.
-लेखी परीक्षेत अधिकतम समान गुण प्राप्त करणारे ३ पेक्षा अधिक उमेदवार पात्र ठरल्यास उमेदवार निवडीबाबत अंतीम निर्णय सरळ सेवा भरती समिती, एरंडोल नगरपालिका यांच्याकडून उमेदवाराची शारीरिक क्षमता, गुणवत्ता व तदअनुषंगिक इतर बाबींचा विचार करून घेण्यात येईल व तो परीक्षार्थीस बंधनकारक राहील.
-महाराष्ट्र नागरी सेवा नियम (लहान, कुटुंबाचे प्रतिज्ञापन) नियम २००५, दि. २८ मार्च २००५ च्या अधिसुचनेनुसार विवाहित उमेदवारांना लहान, कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे.
-आवश्यक ती अर्हता धारण करणारे किंवा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास तसेच कोणत्याही प्रशासकीय कारणास्तवर रद्द करणे व पुढे ढकलणे किंवा त्यात फेर बदल करण्याचे सर्व अधिकार नगराध्यक्ष तथा अध्यक्ष, सरळ सेवा भरती समिती, एरंडोल नगरपालिका कार्यालय यांचेकडे राहतील आणि याबाबत अर्जदाराला कोणताही दावा करता येणार नाही.
– वरिल नमूद पदाची संख्या कमी/जास्त बदल होऊ शकतो. याबाबत अर्जदारास कोणताही दावा करता येणार नाही
– अधिवास अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
– ‘नोंदणी क्रमांक’ हा अर्जातील रकाना कार्यालयाद्वारे भरण्यात येईल.
– अर्जाचा नमुना नगरपालिका कार्यालय, एरंडोलच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याप्रमाणेच असावा.
-प्रतिक्षा यादी प्रसिध्द झाल्यापासुन ती फक्त ०२ वर्षाच्या कालावधीपर्यंत वैध राहिल.
– ओळखपत्र असल्याशिवाय लेखी परिक्षेस हजर राहण्यास परवानगी मिळणार नाही.
– उमेदवाराने स्वत:चा पुर्ण पत्ता पिनकोडसह, भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी लिहिलेला व २५ रुपयांचे पोस्टाचे तिकीट चिकटवलेला लिफाफा स्वतःचा पत्ता लिहिलेल्या आर पी ए. डी. च्या पोहोच पावतीसह अर्जासोबत जोडावा.
– उमेदवाराने त्याचे/तिचे एक जादा पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (फोटो) अर्जासोबत जोडावे.

भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा