एरंडोल नगर पालिकेतर्फे शाडू मातीपासून श्री गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२१ । एरंडोल शहरातील सर्व नागरीकांसाठी शाडू मातीपासून श्री गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजितकरण्यात अली आहे. मंगळवारी सकाळी १०:३० वाजता नगर पालिका हॉल येथे आयोजन करण्यात अली आहे.

कार्यशाळा शहरातील सर्व नागरिकांसाठी मोफत आहे.कार्यशाळेत सहभागी नागरिकांना मूर्ती बनविण्यासाठी लागणारी शाडू माती नगर पालिकेतर्फे पुरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे एकूण दोन गट करण्यात आले आहे. १)सार्वजनिक मंडळ २)घरगुती गणपती.प्रत्येक गटामधे तीन उत्कृष्ट पर्यावरण पूरक देखाव्याना पारितोषिक दिले जाणार आहे. कार्यशाळेत सहभाग घ्यावा ही विनंती मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या तर्फे करण्यात आली आहे.  तसेच वर्षभरातील सर्व सण उत्सव हे पर्यावरण स्नेही व निसर्ग स्नेही साजरे करण्याचा निश्चय करावा असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar