fbpx

एरंडोल नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । रणगांव नगरपरिषद अधिकारी यांच्यावर दाखल खोट्या गुन्हाच्या विरोधात एरंडोल नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करणेबाबत एरंडोल मुख्याधिकारी किरण देशमुख यांना निवेदन दिले.

निवेदनात वरणगांव नगरपरिषदेचे पंकज संतोष सुर्यवंशी,प्रशासकीय अधिकारी व गणेश रामचंद्र चाटे, आरोग्य व पा.पु.अभियंता नगरपरिषद वरणगांव यांचे विरुध्द वरणगांव पोलीस स्टेशन मध्ये सरकारी पंच म्हणुन अर्धवट लिहिलेल्या, कोऱ्या कागदावर सह्या करण्यास नकार दिल्यामुळे वरणगांव पोलीस स्टेशन मार्फत दाखल करण्यात आलेल्या खोटया गुन्हयाच्या विरोधात एरंडोल नगरपरिषद अधिकारी,कर्मचारी यांच्या वतीने दि २३ रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन करत असल्याचे निवेदन देण्यात आले.

तसेच सदर नगरपरिषदेचे अधिकारी यांच्या विरुध्द दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे जोपर्यंत मागे घेण्यात येणार नाही तसेच सबंधित सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिपकुमार बोरसे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही होत नाही तोपर्यंत दि १ ऑगस्टपासुन सर्व अत्यावश्यक सेवासह बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे व पोलीस स्टेशन मार्फत वारंवार नगरपरिषदेच्याच कर्मचा-यांची पंचनामा करणेकामी पंच म्हणुन मागणी केली जाते.

नगरपरिषदेच्या वतीने पोलीस स्टेशनच्या मागणीनुसार नेहमी सहकार्य करण्यात आलेले आहे असे असताना सुध्दा पोलीस स्टेशन मार्फत नगरपरिषद अधिकारी,कर्मचारी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी यांना मानसिक त्रास दिला जात असून यापुढे आम्ही नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी शासकीय पंच म्हणुन जाणार नसल्याचे म्हटले आहे.

याप्रसंगी कर व प्रशासकीय सेवा कर व प्रशासकीय सेवा डॉ.योगेश सुकटे, डॉ.अजित भट,संगणक अभियांत्रिकी सेवा विकास पंचबुधे,स्थापत्य अभियांत्रिकी सेवा देवेंद्र शिंदे, लेखापाल,लेखापरीक्षक सेवा  विक्रम घुगे, पा.पू.जलदाय व स्वच्छता अभि.सेवा प्रियंका जैन, कर व प्रशासकीय सेवा विनोद कुमार पाटील, वाय. एल.परे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज