एरंडोलला लोक अदालतीत ४८ लाख वसूल, महसूल विभागाचा सहभाग

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । नितीन ठक्कर । तालुका विधी सेवा समिती एरंडोलतर्फे एरंडोल न्यायालयात दि.११ रोजी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महसुल विभागाने प्रथमच सहभाग घेऊन लेखापरीक्षणाच्या वसूलीसाठी खातेधारकांना आमंत्रित केले. काही खातेधारकांनी हजर राहून १ लाख ६३ हजार ३३८ रुपये शासनाकडे जमा केले आहे.

लोकअदालतीला तहसीलदार सुचिता चव्हाण, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी शिरसाठ व तहसील कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नगरपालिका, बँक, एम.एस.ई.बी यांच्या एकूण ३८५ प्रकरण निकाली काढून ४७ लाख ८१ हजार ६६९ रुपये एवढी रक्कम वसूल करण्यात आली. क्रिमिनल १६ व सिव्हील ६ प्रकरणे निकाली काढण्यात आले.

या लोक अदालतीचे पंच न्यायाधीश म्हणून जे.जी.पाटील यांनी काम पाहिले. अँड.मधूकर देशमुख, अँड.आल्हाद काळे, अँड.मनोहर महाजन, अँड.प्रकाश बिर्ला, अँड.रमेश दाभाडे, अँड.एस.आर.खैरनार, अँड.दिपक पाटील, अँड.प्रेमराज पाटील, अँड.चंद्रकांत पारखे उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -