fbpx

एरंडोल येथे कोरोनाचा उद्रेक सुरु

mi-advt

एरंडोल  तालुक्यातील ग्रामीण भागासह एरंडोल येथे सोमवारी ६७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात एरंडोल येथे २९ व ग्रामीण भागात ३८ या प्रमाणे एकूण ६७ नविन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील आतापर्यंत कोरोनाने ११२ रुग्णांचे बळी घेतले. आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ४९५३ पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस संक्रमणात होणारी वाढ थांबणे गरजेचे आहे. 

एरंडोल तालुक्यात जवळपास १३/१४ महिन्यापासून कोरोनाचा हैदोस सुरू आहे. त्यामूळे जिवन जगणे अवघड बनले आहे. दुसरीकडे अजूनही नागरिक कोरोना नियमावलीचे पालन करतांना बेजबाबदार दिसून येतात. मास्क व सॅनीटायझरचा वापर , होम क्वांरटीन असताना बाहेर न पडणे. गर्दीत जाणे टाळणे या बाबी बंधनकारक असताना त्यांची सरा्स पायमल्ली केली जात आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज