एरंडोल बीएसएनएलचा कारभार रामभरोसे

 जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । सक्तीच्या स्वेच्छा निवृत्तीमुळे बीएसएनएलचा कारभार रामभरोसे सुरू असून कर्मचारी इंजिनिअर अभावी नागरीकांना मात्र मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. फोन, मोबाईलची बील पोस्टाने तर पाठविले जातच नाहीत परंतू एसएमएस, मेसेज देखील ग्राहकांना पाठवित नाही. त्यामुळे ग्राहकांना दंडाचा भूर्दंड मात्र सहन करावा लागत आहे.

यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, एरंडोल तालूक्याचे ठिकाण असून स्वतंत्र दूरसंचार इमारत देखील आहे . मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या सवलती देणारे मोबाईल कंपन्या असल्याने बीएसएनएल मात्र दर कमी करण्याऐवजी दर वाढवून ग्राहकांची लूट करीत आहे. एरंडोलला बीएसएनएलचे लँडलाईन (एलएल) सह मोबाईलचे ग्राहक खूपच कमी असल्याने आणि ब्रॉडबँडच्या सुविधांमुळे काही ग्राहकांना केवळ नाईलाज म्हणून सेवा घेणे गरजेचे आहे. दोन वर्षांपूर्वी सक्तीच्या म्हणा अथवा धोरणात्मक निर्णय म्हणा ७५ टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी, इंजिनिअरांनी स्वेच्छा निवृत्ती घेवून बीएसएनएलला रामराम केला. त्यामुळे केवळ मोजक्या कर्मचारींवर कारभार सुरू आहे.

एरंडोल शहरासह तालुक्यात अनेक कंपन्यांचे टावर उभे राहिले. त्यांच्या रेंजची देखील तक्रार नाही परंतू बीएसएनएलच्या टावरची संख्या जेमतेम असल्याने रेंजच्या तक्रारी कायम आहेत . केवळ याच कारणांमुळे बीएसएनएल देशाचे असून देखील भोंगळ, अनागोंदी कारभारामुळे ग्राहक नाहीत. लँडलाईन दुरुस्तीसाठी कोणीही येत नाही यास म्हणावे तरी काय ? उशिरा बील भरल्यास दंडात्मक कारवाई अथवा डिस्कनेट केले जाते यास म्हणावे तरी काय?

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज